लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या लेखामध्ये चुणुक किंवा पुस्ती म्हणून हा मजकूर आहे :

'बीएमएम' अभ्यासक्रम मराठी माध्यमातून होऊ नये म्हणून जे जे प्रयत्न झाले ते मराठीप्रेमी आणि विद्यार्थीहितरक्षकांनी कसे हाणून पाडले त्याचा हा आढावा. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा प्रकारच्या प्रयत्नाला यश येणे ही मराठीसंवर्धनाच्या चळवळींना उत्साहवर्धक ठरावी.

मला वाटते, हे सगळे संघर्ष आणि त्यात मिळालेला विजय अशा स्वरूपाचे वर्णन आहे. संघर्षात आणि लढ्यात मिळालेला विजय हा नेहमीच उत्साहवर्धक असतो.

भविष्यात संघर्ष/विजय/पराजय असे काही न होता  असे बदल साहजिक स्वरूपात होऊन त्यांचे लाभ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळू लागतील तेव्हा(च) अशा प्रयत्नांना सर्वार्थाने यश मिळाले असे म्हणता येईल असे मला वाटते.