आजच्या ईसकाळात ही बातमी वाचली.

आता एसटीचेही ऑनलाइन रिझर्व्हेशन

एसटी महामंडळाचा हा पायलट प्रोजेक्ट असून; तो पहिल्या टप्प्यात राज्याच्या दहा आगारांतून राबविला जात आहे, असे कळते.

ऑनलाइन आरक्षण तिकिटासाठी ज्या गावाला जायचे आहे, त्या गावाचे तिकीटदर व आरक्षणशुल्क आकारले जाईल. मात्र, आरक्षणशुल्काचे दर काय राहतील, हे निश्चित नसले तरी ते नागरिकांना परवडणारे असेच राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शहरांत ही सेवा सुरू होत आहे, तेथूनच या सेवेचा लाभ घेता येईल.

 असे बातमीत शेवटी म्हटलेले आहे.