रोज रोज मी यायचे इथे आणि जायचे मी निराशुनी
या जगासही मी निराशसे करत जायचे एकदा तरी ॥

यातील भावना नाही रुचल्या. पहिल्या कडव्यांप्रमाणे हे दमदार, उभारी देणारे नाही वाटत.

'हारवायचे' की 'हरवायचे' ?  बालपणात हरवणे हीही एक मजा होती. एका यात्रेत मी व माझा थोरला भाऊ दोघेही चुकलो. लोकांनी आम्हाला पोलीसांच्या हवाली केले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मी 'आमचे आई-वडील चुकले' असल्याचे सांगितले तेव्हा पोलीस खळखळून हंसले होते, त्या प्रसंगाची आठवण झाली.