मिलिंद राव आपण डेअर-डेव्हील आहात... हा हा.. कारण आपण ह्या विषयाला हात लावण्याचे धाडस केलेत... अभिनंदन! म्हणून शूर वीर म्हणायच्या ऐवजी 'डेअर डेव्हील' म्हणतोय.. (इथे सुद्धा डेव्हील आहेच, पण शुभ अर्थाने :))..
आडामधल्या कुवाँर माता अश्वत्थावर वसल्या होत्या
पंचक्रोशितिल सभ्य कुळांचा जमलेला गणगोत असावा.. समाजातील दंभावर सणसणीत चपराक आहे... जोरदारच!
अश्वत्थाच्या पानोपानी कर्मकहाण्या अन् रडगाणी
वेताळ्याच्या प्रश्नांचाही तोच, विक्रमा, स्रोत असावा.. फार आशय-गर्भ ओळी आहेत.. गंभीरपणे विचार केल्यास
केवळ शीर्षासन केल्याने योगपुरुष का ठरतो कोणी?
मुळे ऊर्ध्व अन् खाली फांद्या असा तरू लाखोत असावा... वा उत्तम कल्पना विलास! गीतेतील उर्ध्व-मूलम अधः शाखा हा श्लोक स्मरला.. ह्या द्विपदीत युगपुरुष ह्या शब्दाचा प्रयोग, कुठे झाला तर अर्थाला वेगळी झालर प्राप्त होईल का, असा विचार करतोय!
ह्या रचनेचे वृत्त ; 'त त त त प प प प' असले पाहिजे :)
-मानस६