मिलिंद,

गझल आवडली,

अवसेला पिंपळ सळसळतो, स्पर्श भुतांचा होत असावा
अथवा कोणा वेताळाच्या उच्छ्वासाचा झोत असावा - वा!

शीर्षासन, 'स्रोत' अप्रतिम.

वाचल्यावर ग्रेसच्या 'पाउस आला, पाउस आला गारांचा वर्षाव' या कवितेतल्या ह्या ओळी आठवल्या...

या गावाच्या पारावरती कुणी नसे रे वेडी
गढीत नाही भुजंग शापित जो वंशाला तोडी...

तुमची सगळीच गझल जरी भुता-खेतांवर असली, तरी सुसंबद्ध (मुस्सलसल) आणि सुगम आहे.

विस्मृतीतल्या बाल्याचा धूसर धागा दोहोत असावा ... हाही शेर/कल्पना अप्रतिम. फक्त दोहोंत (मधला अनुस्वार अनेकवचन दाखवणारा) असायला हवं असं वाटलं आणि त्यामुळे जरा अलामत पाळली जात नाही असं वाटलं. अर्थात, संपूर्ण गझल एवढी सुरेख आहे की हे म्हणणंही मला खटकतंय.

- कुमार