आजच्या दै. सकाळ (ठाणे आवृत्ती) मध्ये नेटाने चालली मराठी या शीर्षकाखाली मेधा कुळकर्णी यांचा एक वाचनीय लेख आहे. त्यात मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी जालविश्वाच्या सहभागाविषयी कौतुक आहे. या जालविश्वात रमणारे २५-३५ वयोगटातील दिसतात, असे त्यांचे विधान आहे. सदर लेखात मनोगत-चाही उल्लेख आहे. मनोगत जालाच्या सदस्यांच्या वयोगटाविषयीची स्थिती अशीच आहे कां?