माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
पुन्हा एकदा वॉशिंग्टन डि.सी. ला जायचं म्हटल्यावर कोण उत्साह संचारला वगैरे काही नाही. पण भारतातून कुणीही आमच्याकडे आलं की हे चार-पाच माझ्या भाषेत टिकमार्क आहेत तिथे भोज्ज्या करावाच लागतो. मी स्वतः पहिल्यांदा सर्व ठिकाणे पाहायचे तेव्हाचा तो पहिलेपणा आता येणं कठीणच आहे तसं पण असो. तर दोन आठवडयापुर्वीच्या शनिवारी अशी एक डि.सीवारी लागु झाली होती. मला वाटतं नवराही आता थोडा करायचा म्हणून काही टिकमार्क करतो म्हणून यावेळी निघेनिघेस्तोवरच जवळ जवळ अकरा वाजले. म्हणजे जरी वट्ट दोन तासात पोहोचलो तरी साडे-पाचला तिथली म्युझियम्स बंद होतात म्हटल्यावर ...