मला सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरचा अभ्यास करताना 'प्रतिचार' असा शब्द सापडला (संदर्भ: सेट: पेपर १, प्रगती प्रकाशन, पुणे. पृ. १.३२) पण या शब्दाचा शोध मला आपण दिलेल्या दुव्यांच्या माध्यमातून घेता आलेला नाही. मुळात माझ्याकडे संगणक नाही. मी सायबर कॅफे ( मराठी शब्द ? ) चा वापर करतो. मात्र तेथे युनिकोड नाही. हीच परिस्थिती माझ्या ग्रंथालयातील संगणकाची आहे. माझे कॉलेज सहकारीही अशा गोष्टींत रसिक नाहीत, की त्यांच्या मदतीने मी युनिकोडचा वापर करू शकेन. अशा परिस्थितीत मी काय करू शकेन याची माहिती हवी आहे. मी स्वतः तज्ज्ञ म्हणता येईल इतका संगणक-साक्षर नाही. माझे कॉलेज व्यवस्थापनशास्त्र संबंधित असून तेथे मराठी शब्दकोश नाही. माझ्याकडे आपट्यांचा शब्दकोश आहे, पण त्यात हा शब्द नाही. काही मदत होईल का? 'प्रति' या उपसर्गाशिवाय 'चार' या शब्दाचा काही वेगळा अर्थ (एक संख्या, ज्यामध्ये सजीवता आहे अशी गोष्ट, इ‌. सोडून) मिळतो का तेही पाहिले. वरील पुस्तकातच 'अनुधावन' असा शब्द सापडला, त्याचीही तीच अवस्था आहे. हे दोन्ही शब्द संशोधन पद्धती (Research Methodology) शी संबंधित आहेत.