आपल्याला हवे ते शब्द मनोगतावर देवनागरी युनिकोडमध्ये तयार करून, त्याची प्रत घेऊन, ती गूगल शोधयंत्रामध्ये चिकटवून शोध घ्यावा.
गूगलमध्ये "प्रतिचार" (दुहेरी अवतरणांसह) शोधल्यावर झालेले निष्पन्न
पैकी पहिल्या दुव्यावर गेले असता मिळालेल्या मजकुरावरून 'प्रतिचार'चा अर्थ संकल्पना (कन्स्पेप्ट) असा असावा असे वाटते.
गूगलमध्ये 'अनुधावन' शोधल्यावर झालेले निष्पन्न
पैकी पहिल्या दुव्यावर गेले असता मिळालेल्या मजकुरावरून 'अनुधावन'चा अर्थ मागे जाणे, मागे धावणे, मागे लागणे असा काहीसा असावा असे वाटते.
अशा प्रकारे गूगल शोधयंत्राचा वापर करावा.