एक मराठी माणुस... येथे हे वाचायला मिळाले:

सिग्नलपाशी रिक्शा थांबली. उजवीकडून चिमुकला हात पुढे झाला. चेहरा बघायच्या आधीच सणसणीत शिवी हासडली. चटका बसल्यागत हात मागे. नजरेचा जाळ फेकण्यासाठी मान वळवली. समोर भेदरलेला चेहरा. चार-पाच वर्षांच्या मुलीचा.

पाचवी-सातवीत असतानाचा किस्सा. दोन रुपयांच्या दोन करकरीत नोटा कपाटातून 'उचलल्या' होत्या. चॉकलेटसाठी अशी उचलेगिरी बहुतेक वेळा ठरलेली. आईची नजर चुकवून घराबाहेर पडलो आणि 'ती' दिसली... चाळीच्या गेटवर कपड्यांच्या लक्तरात गुंडाळून बसलेली, कडेवर शेंबडं पोर. नजरेत व्याकूळ भाव. हात पुढे न करताही काहीतरी मागणारे. ती नजर चुकवून पुढे आलो. अशांना ...
पुढे वाचा. : तो चिमुकला चेहरा