एक मराठी माणुस... येथे हे वाचायला मिळाले:

सकाळचे आठ. ठिकाण दादर रेल्वेस्टेशन. खटडक् खटडक् खटडक् आवाजात लोकलचा प्रवेश. शेकडोंची गर्दी. उतरणाऱ्यांची, चढणाऱ्यांची घाई. मग एकामेकांना खुन्नस. यात कसा बसा मी चढलो. जागा भेटली. लोकल सुरू. डब्यात कित्येक जण उभे. जागा कमी-माणसं जास्त. काही उभ्यानेच डुलक्या घेतायत, कुणी उरलेला अभ्यास करतोय, कुणी कादंबरी वाचतोय तर कुणी तंबाखू चोळतोय. गेल्या दोन महिन्यात कित्येकांना अशा उरलेल्या गोष्टी अगदी उरलेल्या आयुष्यासकट संपवतांना पाहातोय.

संध्याकाळ... दिवस बरा गेला. ऑफिसातून बाहेर पडून सीएसटी स्टेशनवर आलोय. लोकलमधे जाऊन बसलो. भरपूर जागा, माणसं ...
पुढे वाचा. : मुंबई शहरं आणि माणसं