महेशजी, खरोखर मनापासून धन्यवाद. हे दोन्ही शब्द हिन्दी असतील, याचा अंदाजच नव्हता. एरवी मला माझ्या संग्रहातला श्रीपाद जोशींचा हिन्दी-मराठी शब्दकोश उपयोगी पडला असता. (अर्थात, अंदाज आला असता तरी पुण्यात खोलीवर सगळीच पुस्तके मी ठेवू शकत नाही, घरी बारामतीला गेल्यावरच बघणे झाले असते.)  तुमची खरोखरच मदत झाली. मुख्य म्हणजे शोधप्रक्रियेची नवीन माहिती मिळाली. मनोगतवर टंकलिखित मजकुराची गुगलवर प्रत करता येईल, या तुमच्या सूचनेसाठी तुम्हांला खरोखरच धन्यवाद.