"दिसते सभोवती का सारेच लाल रंगी
दृष्टीच आज माझी रक्ताळली असावी

माझ्या तुझ्या कथेचा उडलाय बोजवारा
पात्रे कथानकाला कंटाळली असावी

शिलगावले कितीदा पण पेटलोच नाही
काडीच ह्या जगाची सर्दावली असावी

बघतेय वाट ती ही आता उजाडण्याची
म्हणुनी निशा जराशी रेंगाळली असावी"              .... खास, एकूणच गझल आवडली !