Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
माझी आजी ( आईची आई ) मी सहावीत असताना खूप आजारी होती. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. आजीला बरं नसल्याचे पत्र आले शिवाय मोठा मामाही ( ति. दत्ता भट- पार्ल्याला राहत होता. ) आला आईला सांगायला. तो तसाच तडक नाशिकला गेला. आम्ही दोघेही लहान त्यात बाबांचा साईट जॉब. सकाळी आठला जात पण येण्याचे टाईमींग नव्हते. रात्री आठपासून दहापर्यंत कधीही येत. तेही मुंबईतच काम सुरू असेल तर, बाहेर असेल तर मग ते गायबच असत. सुदैवाने बाबा मुंबईतच होते. आईचा जीव काही राहीना. तेव्हा पोस्टात जाऊनच फोन लावावा लागत असे त्यामुळे फक्त पत्रांचा आधार. आजीची प्रकृती बिघडली. ती ...