ह्या विषयावरची कविता लिहिणं अवघडच काम आहे ! आणि तुम्ही ते अगदी लीलया केलंत. तुम्हाला सलाम !
इतके दिवस झाले ही कविता तुम्ही इथे देऊन, पण नक्की कसा प्रतिसाद लिहावा ह्या विचारात होतो...! पण 'सलाम' शिवाय काहीच सुचत नाहीये..

पारावरल्या मुंजाशी मी हल्ली गट्टी करतो आहे
विस्मृतीतल्या बाल्याचा धूसर धागा दोहोत असावा

अश्वत्थाच्या पानोपानी कर्मकहाण्या अन रडगाणी
वेताळ्याच्या प्रश्नांचाही तोच, विक्रमा, स्रोत असावा

ह्या द्विपदी तर अत्युत्तम !

शुभेच्छा...!