झाली आशा जरि बहु दिनानंतर दृश्य येथे
मध्येची ही नकळत अशी गुप्त का झालि वाटे
असो ! बऱ्याच दिवसानंतर आपले दर्शन मनोगतावर झाल्याने आनंद झाला‍ .अजून सविस्तर रसग्रहण आवडले असते. 
मंदाक्रांता वृत्तलक्षणानुसार  खालील ओळीत ऱ्हस्व दीर्घाची  अशी सुधारणा हवी. कदाचित मनोगतच्या स्वयंसुधारणेचा परिणाम होऊन या चुका झाल्या असाव्यात.कविवर्य वसंत बापटांनीही शेवटच्या ओळीत एक अक्षर ज्यादा टाकले आहे. (प्रत्येक ओळीत १७ अक्षरे हवीत )

                         सुधारित ओळी
प्रेमी कांताविरहि अचली घालवी मास काही
गेले खाली सरुनि वलय स्वर्ण, हस्ती न राही।
आषाढाच्या प्रथम दिनि तो मेघ शैलाग्रि पाहे
दंताघाते तरि गज कुणी भव्यसा खेळताहे॥

झाली काव्ये कितिक असती, अन पुढेही असोत

आणखी एक गोष्ट म्हणजे मराठी अनुवादही समजण्यास अवघडच वाटतो. तो कोणी केला आहे ? त्याचे पुन्हा सुगम गद्य मराठीत रूपांतर हवे असे वाटते.