मराठी असल्यामुळे माझी जी मराठी भाषिक भाचेमंडळी आहेत त्यांच्याशी आवर्जून मराठीतून बोलते. परदेशी स्थायिक झालेल्या नातलगांशी मराठीतून पत्रव्यवहार करते. मराठी नातेवाईक, मित्रमैत्रिणी, परिचितांना मराठी वेबसाईटस चे पत्ते, मराठी शुभेच्छापत्रे पाठविते. मराठीतून भरपूर लिखाण करते. मराठीत थोर संत श्री श्री रविशंकरजींच्या प्रवचनांचे, साहित्याचे अनुवाद करते, ते लोकांपर्यंत पोहोचविते. सकाळसारख्या वृत्तपत्रात मराठीतून लिखाण करते, प्रतिक्रिया नोंदविते. मराठीत साहित्यनिर्मिती करून त्यास इंटरनेट, मासिके, वृत्तपत्रांतून इतरांपर्यंत पोहोचविते. नुकतीच मी मराठीतून मोबाईलवर एस एम एस करायला शिकले, आता इतरांचे काही खरे नाही! त्यांच्यावर माझ्या मराठीतील संदेशांची तलवार चालणार!

-- अरुंधती कुलकर्णी