१. मंगळवारी नखे कापू नयेत.
२. प्रवासाच्या आधी नखे/केस कापू नयेत.
३. सोमवारी केस कापू नयेत. (दुकान पण सोमवारी बंद असे.)
४. कोणी प्रवासाला गेल्यावर मागे राहिलेल्यांपैकी कोणी लगेच अंघोळ करू नये.
५. जेवताना कोणाच्या हातातून मीठ देऊ/घेऊ नये, ते टेबलावरून किंवा जमीनीवरून सरकरवून द्यावे/घ्यावे. सरळ हातातून घेतले तर त्या दोन व्यक्तींमध्ये नंतर कधी खूप भांडण होते. (हा (गैर)समज मला काल-परवा पर्यंत माहित नव्हता! आता मला किती जणांशी भांडावे लागणार आहे कोणास ठाऊक?)
६. बाहेर पडता पडता "कुठे चालला?" असे कोणाला विचारू नये.
७. (काळी) मांजर आडवी गेली तर कामाचा सत्यानाश होतो.
यातल्या एकालाही माझ्याकडेतरी तर्कशुद्ध उत्तर नाहीये!