शब्दबंध येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या वर्षी शब्दबंध हा उपक्रम सुरू झाला. ब्लॉग लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या लोकांचे इ-स्नेहसंमेलन असा ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. ह्या वर्षी तोच उद्देश पुढे ठेवून दुसरे शब्दबंध साजरे झाले. शनिवार दि. ६ जून २००९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता शब्दबंधचे पहिले सत्र सुरू झाले आणि रविवार दि. ७ जून रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता चौथे सत्र संपले. वेगवेगळ्या वेळी चार सत्र ठेवून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या अधिकाधिक सभासदांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळ जवळ पन्नास च्या आसपास लोकांनी सर्व सत्रात भाग घेऊन ...