वरील अनुवाद चितामणी द्वारकानाथ देशमुख यांनी केलेला आहे.

ते पहिले जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते. ते भारत आणि पाकीस्तानचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी मंत्रीपद सोडले. त्यांचे इंग्रजीवरही उत्तम प्रभुत्व होते आणि त्यांनी मेघदूताचे तत्कालीन इंग्रजीत सुरस भाषांतरही केलेले आहे. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी संस्कृतमध्ये पी.एच.डी. ही केलेले होते.

कुसुमाग्रजांनीही मराठी अनुवाद केलेला आहे. मात्र तो भिन्नवृत्ती आहे.

मनोगतावरच यापूर्वी कुणीतरी मेघदूताच्या मराठी अनुवादाचा प्रयत्नही केलेला आहे. तिथेच मूळ संस्कृत श्लोकही लिहीलेले सापडतील. 

धूमज्योतिः सलिलमरुतः संनिपातः क्व मेघ ।
संदेशार्थे क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयः ॥
इत्यौत्सुक्यादपरिगणयन गुह्य कत्स्यन ययाचे ।
कामार्ताही प्रकृतीकृपणाः चेतनाचेतनेषू ॥

म्हणजे

धूर, ज्योत, पाणी, वारा यांचे मिश्रण असा तो मेघ ।
त्याची योजना प्राण्याकरवीच पाठवावा, असा संदेश पाठवण्यासाठी का करावी ॥
तरीही, यक्षाने प्रणयाराधनेत तल्लीन होत असता हे रहस्य, गौण समजले ।
आणि त्यामुळे, सजीव व निर्जीव यांतील फरकाकडे दुर्लक्ष करून, तो (संदेश) ढगाकरवीच पाठवला! ॥