हाहाहाहा. शीर्षक मस्तच. आवडला किस्सा. तुम्हीदेखील किस्सा छान रंगवून सांगितला आहे. ह्यावरून आठवले की कोल्हापूर-सातारा-सांगली ह्या पट्ट्यात "मुलाचे/मुलीचे कपडे काढायला जाणे" म्हणजे लग्नबस्त्याची खरेदी करायला जाणे. "मुलाचे कपडे काढायला कोल्हापूरला जातो आहे हे" असे वाक्य जेव्हा कानी पडले होते तेव्हा मी उडालोच होतो. शब्दांचे अर्थही प्रदेशानुसार बदलतात. 'बिकट' म्हणजे 'कठीण'. पण नागपुरात 'बिकट' म्हणजे 'खास', 'झकास'. उदा. 'फार बिकट कवर ड्राइव मारला'. पसारा म्हणजे अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू वगैरे वगैरे. पण कोल्हापूर-बेळगाव भागात 'पसारा' हा शब्द 'सामान' ह्या अर्थानेही वापरतात. चूभूद्याघ्या.