Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
अव्याहत लोकलने प्रवास करणाऱ्या विविध वयोगटात लहान मुलेही असतातच. काही मुले अगदी वयाच्या पाच-सहा वर्षापासून वस्तू विकतात काही गाणी म्हणतात तर काही भीक मागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकल हेच त्यांचे जीवन असल्याने लवकरच ही सगळी मुले अनेक वाईट प्रसंगांना सतत सामोरे जाऊन जाऊन मुर्दाड बनतात. सगळ्यांचाच जीवनप्रवाह अतिशय वेगाने चाललेला असल्याने धड स्वतःकडे, स्वतःच्या घरच्या माणसांकडेही पाहायला पुरेसा वेळ नसलेले आपण अशा मुला-मुलींकडे पाहून जीव कितीही तुटला तरी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. शिवाय ह्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की ...