आजच्या लोकसत्तेत हे वाचायला मिळाले :
सुप्रिया सुळेंनी घेतला पुढाकार
मुंबई, २४ जून / प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापासून मंत्रालयात लाल फितीमध्ये अडकून पडलेल्या मराठी भाषेतील बीएमएम अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याबाबतची घोषणा उद्या, गुरूवारी होणार असल्याचे समजते. मराठी भाषेतील बीएमएमला मंजुरी देण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना विनंती केली होती. त्यानुसार ही घोषणा होणार आहे. जुन्या ‘बीएमएम’मधील त्रुटी, उणिवा तसेच गैरप्रकार ‘लोकसत्ता’नेच सर्वप्रथम चव्हाटय़ावर आणले होते. मराठी अभ्यास केंद्रानेही ‘बीएमएम’ची सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातूनच इंग्रजीसोबत मराठी भाषेतील बीएमएम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याला मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने तसेच व्यवस्थापन परिषदेनेही मान्यता दिली.
......
पुढे वाचा : मराठी बीएमएम अभ्यासक्रमाला आज मंजुरी मिळण्याची शक्यता