रोहिणी, तुझ्या या आठवणींमुळे माझ्याही आठवणींना उजाळा मिळाला.

आय आय टी मध्ये शिकलो खरा. पण मी कधीच पवईत राहिलो नव्हतो.
सगळ्या हॉस्टेल्सच्या वाटा मात्र माहितीच्या होत्या.

पुढे मग 'तुलसी' मध्ये जाण्याचेही योग अनेकदा आले. वरल्या टेकडीवरही एकदा गेल्याचे आठवते.

राधाकृष्ण हॉटेलही आठवते. मात्र माझी गाठ पडे ती वाय पॉईंटवरच्या यादव डेअरी फार्मशी. (छेडाजवळचे)
हल्ली तेही नाहीसे झाले आहे. (आणि छेडाही!)

आय आय टी समोरचा आदी शंकराचार्य मार्ग, जेमतेम एक बस जाईल एवढा होता तेव्हापासून आज जो रनवेसारखा विस्तृत झाला आहे तोपर्यंतच्या त्याच्या सर्वच अवस्था मी नेहमीच पाहत आलो आहे. मात्र जॅम होण्याची त्याची प्रवृत्ती आजही कायमच आहे. माझ्या तिथल्या शिकण्याच्या काळात जेव्हा तो जॅम होई तेव्हा तिकीट काढलेले असूनही आम्ही बसमधून उतरून टेकडीवरून उतरत पाऊलवाटेने कांजुरमार्गला जात असू. आणि तरीही बसच्या आधीच पोहोचायचो.