"जीर्ण झाले आपले संबंध आता एवढे की -
पान एखादे स्मृतींचे चाळताही येत नाही!
वाटते जाऊ नये; पण जायचीही वेळ आली...
काढत्या पायासवे रेंगाळताही येत नाही!
गैरसोईचीच ना ही एवढी जवळीकसुद्धा?
नीट काहीही कसे न्याहाळताही येत नाही!!
एकदा का उलगडाया लागला की लागला हा...
आठवांचा गालिचा गुंडाळताही येत नाही!
एकमेकांची करू या चौकशी आता जराशी...
भेटलो आहोत; तेव्हा टाळताही येत नाही! " ...... एकदम खास - प्रदीपजी, गझल छानच !