एकदा अगदीच वैतागून कंटाळा म्हणाला...
'दुःख माझे हे, मला कंटाळताही येत नाही! '

एकदा का उलगडाया लागला की लागला हा...
आठवांचा गालिचा गुंडाळताही येत नाही!

एकमेकांची करू या चौकशी आता जराशी...
भेटलो आहोत; तेव्हा टाळताही येत नाही!

वा वा वा वा ! फार मस्त द्विपदी!

गझल आवडली. पु. ले. शु.