का कोण जाणे - पण मुंबईतही - आज च्या घडीलाही - बिल्डींग कॉन्ट्रक्टर्स कडे कामाला असणारे मजूर वर्ग, काही विशिष्ठ जमातीतले घरगडी/बायका अमावस्येला काम करीत नाहीत. साधारणतः काही कामगरी वर्ग /जमाती ज्यांना हक्काच्या रजा मिळणे शक्य नव्हते व ज्यांचे घर हे रोजंदारी वर (बिल्डर्स कडे आठवड्याच्या हजेरी वर पगार मिळतो) चालते त्यांना कमीत कमी महीन्यातून एक भरपगारी सूटी मिळावी ही ह्या मागची भावना असावी.  ही सूटी साधारण सणावारी किंवा महत्वाच्या दिवशी असू नये हा मालक वर्गाचा उद्देश्य असावा - अमावस्येला त्या काळी सर्व व्यवहार (आवश्यकतेचे व्यवहार सोडल्यास) थंड असायचे - म्हणून ही प्रथा पडली असावी असें मला वाटते मात्र ह्या मागे शास्त्रीय कारण नसून सामाजीक भाव जास्त आहे. 

"नजर लागणे" ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचे माझे मत आहे. त्या अनुषंगाने मग मिठ मोहरी चा सतका, लिंबू मिरची, चप्पल (ट्रकच्या मागे), काळी बाहूली (घरावर) हेच नाही तर कर्नाटकात बंगल्याच्या बाहेर दारांवर चक्क माठाला राक्षसाच्या रूपात रंगवून ठेवले असते.

हिंदू धर्मात सर्वांधीक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत व हे निर्विवाद सत्य आहे. काही श्रद्धांच्या मागे शास्त्रीय किंवा सामाजीक कारणे आहेत पण काही मात्र थोतांड आहे.

आपले सर्वांचे मत काय ?

माधव