नमस्कार,
आपली मते खरेच विवहेच्छुक "मुलींच्या" मनातील बोल आहेत. आपल्या मतांशी मी आगदी सहमत आहे पण त्यात आणखी काही मुद्दे मांडु ईच्छितो. विषेशतः या विधानाशी
"तो मला समजून घेऊ शकेल की नाही? त्याच्या घरचे कसे असतील? ते माझ्याशी कसं बोलतील? माझ्या आईबाबांबद्दल त्यालाही तेवढंच प्रेम वाटेल ना जितकं मला वाटतं... मी त्याच्या आईबाबांची सुन बनेन की मुलगीच? तो माझ्या आईबाबांना स्वत:च्या आईबाबांना देतो तसा मान आणि प्रेम देईल का?"
मला वाटतं असेच काहिसे विचार मुलांच्या सुध्दा मनात असतात. त्यातील महत्वाचा आहे तो हा:
"ती माझ्या आईबाबांना स्वत:च्या आईबाबांना देते तसा मान आणि प्रेम देईल का की तिला माझे आई-बाबा म्हणजे तिच्या घरातील "आडचन" वाटेल? माझ्या भावंडापासून ती मला दूर करण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना?" अशी भिती सुध्दा तरुणांना असते. आजकाल रुढ होऊ घातलेल्या "फक्त मी, माझा हा आणी मुल/मुलं म्हणजे कुटुंब" या "तरुणींच्या" व्याख्येमुळे असे प्रश्न तरुणांच्या मनात उभे राहणे स्वाभाविक आहे. विषेशतः मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणाला आपल्या आई-बाबांना सुखी ठेवण्याचे जे स्वप्न असते तेव्हा ही आपेक्षा पत्नीकडून असते कि तिने किमान आपल्या आई-बाबांची आवहेलना करु नये.
मी काही उदाहरणे पाहिली आहेत की मुलाचे लग्न जमले की "सेवानिवृत्त" आई-बाबांना मुलाबद्दल वाटनार्या आनंदाबरोबरच स्वतःबद्दल "काळजी" वाटायला लागते. आणी या काळजीचे कारण म्हणजे कुठेतरी शेजारी किंवा मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये लग्नानंतर सुनेकडून "सासु-सासर्यांच्या" झालेल्या वागणुकिमध्ये असते.
मला वाटते कि आजकालच्या मुली आपल्या घरात सासु-सासरे सुध्दा असतील याचा विचार अभावानेच करतात. तुम्हाला वाटतं का कि आजकालच्या मुली या मुद्द्यांचा सुद्धा विचार करतात म्हणून?
ता.क. - कृपया माझे म्हणने वैयक्तिक आहे हे लक्षात घ्या. तसेच मला आपणाला दुखवायचे पण नाही आणि आमच्या "त्यांनी" हा निरोप पाहिला तर नसती जोखीम पण घ्यायची नाही.... हा हा हा!