कौन हो तुम बतलाओ
देर से कितनी दूर खड़ी हो
और करीब आ जाओ
पुन्हा गूगलबाबा ज़िन्दाबाद! केवळ अंतऱ्यावरून ओळखताना वाट लागली. पण या वेळी शोधसुद्धा बराच वेडावाकडा घ्यावा लागला...
'पडतो मी' = 'गिरता हूँ (मैं)', मग 'दे मला करपाशी ठाव तू' = 'बाहों में काहीतरी काहीतरी (बहुधा ले ले)' अशी मजल दरमजल करत करत, गूगलबाबाला आळवत आळवत...
फिर पुकारो मुझे, फिर मेरा नाम लो
गिरता हूँ फिर अपनी बाहों मे थाम लो
... इथवर पोहोचलो. मग हे बोल असलेल्या गाण्यांचा शोध सुरू केला. एके ठिकाणी बरीच गाणी सापडली पण त्यांपैकी कोठल्यातरी गाण्यात हे शब्द असावेत एवढाच अर्थबोध झाला. पण प्रत्यक्षात बोल दिलेले नव्हते. मग त्यांपैकी कोणकोणत्या गाण्यांची ध्रुवपदे वृत्तात बसू शकतात याचा अंदाज बांधून पुन्हा गूगलं शरणं गच्छामि केले, तेव्हा कोठे उत्तर सापडले.
हुश्श!