पुण्याला असताना माझी एक संगमनेरची मैत्रीण होती. ते नेहमी "मी अमुक व्यक्तीला स्टेशनवर सोडवायला जातेय..." असाच शब्दप्रयोग करायची. मला ते फारच मजेशीर वाटायचं. ती असं म्हणाली की मी तिला म्हणायचे, "काय गं? तू ज्या व्यक्तीला स्टेशनवर सोडवायला जातेस, तिला कोणी बांधून/डांबून ठेवलंय का? " 