चघळायला हा शब्द नाही बरोबर ठरायचा कारण हा शब्द केलेल्या क्रियेतून केवळ मौजमजा होणे अभिप्रेत असल्याचे दर्शवते. असे या कथेतल्या मुख्य सुत्रात अभिप्रेत होतेय असे मलातरी जाणवले नाही. जी गोष्ट होऊ शकली असती पण झाली नाही तर मी ती 'चघळेन' कशाला? चांगली असली तरीही किंवा वाईट असली तरीही.. दोन्हीमध्ये ती संभावना चघळून माझे मनोरंजन कसे काय झाले असते? त्याउलट चावळणे हा शब्द केलेली क्रिया ही बिनकामाची असूनही २ मिनिटाचा टाईमपास होणे अभिप्रेत असल्याचे दर्शवणारी आहे.
हां.. जर मला माझ्या आयुष्यात येऊ घातलेल्या अशा संभावित गोष्टी माहिती झाल्या तर त्या मी नक्कीच चावेन... चघळणार अथवा चावळणार नाही! :))