वेदूताई,

सर्वप्रथम तुझं अभिनंदन, पुण्यात फ्लॅट घेतलास म्हणून.

आता लेखाबद्दल. तुझं भरभरून मनापासून केलेलं लिखाण वाचून नेहमीच काळीज हेलावतं. इतर सर्वसामान्यांना जे दृष्य दिसेल त्यात नेहमी तुला काहीतरी असामान्य सापडतं. ती दृष्टी तुझ्याकडे आहे. जगाला प्रेम अर्पावे हा सानेगुरुजींचा विचार फक्त तूच आचरणात आणताना दिसतेस. तुझी लिहिण्याची ष्टाईलही भारी आहे. अगदी रविंद्र पिंगे. मन काही काळ प्रसन्न होतं. असो.

लवकर बरी हो आणि असेच लिहीत रहा.

धीरज