(परिच्छेद १.) ज्या बाजूला पार्किंग असते त्याच्या समोरच्या बाजूचे दुकानदार आपल्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे 'आज पार्किंग समोर आहे' असा फलक आपल्या दुकानांच्या काचेवर लावतात. परवादेखील असाच फलक समोरच्या दुकानदारांनी लावलेला, म्हणजेच पार्किंग आमच्या बाजूला होते.

(परिच्छेद २.) नियमबाह्य पार्किंग केलेली वाहने उचलणारा टेंपो आला. सोबत मोटरसायकलवर आरुढ एक महिला पोलिस कर्मचारीही अवतीर्ण झाली. टेंपोतून भराभर दोन-चार मुले उतरली व त्यांनी आमच्या बाजूला उभी असलेली वाहने टेंपोत चढवायला सुरुवात केली

गडद केलेल्या नि विशेषतः अधोरेखित केलेल्या शब्दांवरून मला तरी त्या वाहनचालकाने नियम कसा मोडला हे कळलेले नाही. लेखनात काही गफलत जाणवते किंवा मी समजून घेताना चुकलो. क्षमस्व.बाकी हा विषय तसा खरोखरच चर्चा करण्याजोगा आहे.