Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

आता आठ दिवसात दिवाळी येणार...... मग खूप मजा. जुई स्वत:शीच बडबडत होती. शाळेला सुटी लागलीच होती. पहिलीत होती जुई. आई-बाबा व धाकटा भाऊ. चौकोनी कुटुंब. मध्यमवर्गीय. आमदनीपेक्षा खर्च जास्त होता नये. पगाराचा पाचवा भाग शिल्लक ठेवायचा म्हणजे अडीअडचणीला उपयोगी येतो अशा शिकवणीतले. सणवार, असेल त्यात आनंदाने साजरे करायचे.

जिकडून तिकडून फराळाचे वास येत होते. खमंग बेसन भाजल्याचा तर त्याला छेदणारा भाजणीच्या चकल्यांचा वास. लहान मुले एकमेकाला आणलेले फटाके नवीन कपडे दाखवत आनंदाने खेळत होती. जुईही आता बाबा कधी आपल्याला कपडे फटाके आणायला घेऊन जातात याची ...
पुढे वाचा. : समज...