१८६५ सालपासून ते १९९४ सालापर्यंत मेघदूताचे एकूण बावीस मराठी पद्यानुवाद प्रसिद्ध झाले आहेत. ते असेः
कृष्णशास्त्री चिपळूणकर(१८६५), रा. प. सबनीस(१९५८), शां आ. सबनीस(१९३८), द.वें. केतकर(१९५६), डॉ. रा. चिं श्रीखंडे(१९५०), डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख(१९४४), कुसुमाग्रज(१९५६), बा.भ.बोरकर(१९८०), द. वि. पंडित(१९५४), ग. नी. कात्रे(१९५५), ना. ग. गोरे(१९६४), डॉ. वसंत पटवर्धन(१९७१), रामचंद्र गणेश बोरवणकर(१९३५), वसंत बापट(१९८७), भा. शं. देवस्थळी(१९०१), ग. रा. हवालदार(१९५०), बा. ल. अंतरकर(१९०५), शं गो. जोशी(१९६९), ल. ग. लेले(१९०१), गं. गो. दामले(१९०६), सुमंत(?), शांता शेळके(१९९४).
भारतातील अन्य भाषांत गुजराथी(> ९), बंगाली(> २), हिंदी(> ६). याशिवाय, कन्नड, तमिळ, तेलुगू, मलयालम, उर्दू, या भाषांत तर अनेक पद्य भाषांतरे झाली आहेत. याशिवाय, मंगोली, उझबेकी, फ्रेंच, जर्मन(मिस्टर मॅक्समुल्लर), स्पॅनिश, रोमन, रशियन, इंग्रजी(डॉ. होरेस विल्सन, मिस्टर ए. जी. रुक, कीट्स, स्टे. जलर, टी क्लार्क, स्कूट्स) इत्यादी भाषांतदेखील मेघदूताचे अनेक अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत.
याशिवाय अनेक मराठी गद्यानुवाद आहेत. ते असे: गोविंदस्वामी इस्लामपूरकर(१८७०), ग. बा. कानिटकर(१९६६), वा. गो. देवपूरकर(१९८४-८५), मंगरुळकर, हातवळणे, गद्रे, नी. शं. नवरे, वगैरे. मेघदूत नावाचे एक सात अंकी मराठी नाटक गजानन चिंतामण देव यांनी १८९५ साली श्रीमंत होळकरांच्या आग्रहास्तव लिहिले होते. मेघदूतावर अनेक(सुमारे १८) संस्कृत टीका आहेत. त्यांतल्या महत्त्वाच्या टीकाः वल्लभदेव(सर्वात जुनी), सुमतिविजय, सारोद्धारिणी, जिनसेन, सरस्वतीतीर्थ आणि मल्लिनाथ(सर्वात प्रसिद्ध).----------------अद्वैतुल्लाखान