१९५० साली ज्यांनी मेघदूताचा पद्यमय अनुवाद केला त्या कवींचे आडनाव हवलदार आहे, हवालदार नाही.
संस्कृत टीकाकारांच्या यादीत स्थिरदेव हे नाव आलेले दिसले नाही. स्थिरदेवांची टीकासुद्धा खूप जुनी आहे. मेघदूतावर ज्यांची सर्वात जुनी टीका आहे त्या वल्लभदेवांचा काळ अंदाजे इसवी सन ९५०.
नी. शं. नवरे यांनी लिहिलेला तो , मेघदूताचा गद्यानुवाद नसून मुलांसाठी लिहिलेले 'मराठी देवदूतकथा' हे छोटे पुस्तक आहे.
सुफला-संपदा या नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर १९८२ च्या अंकात मेघदूताचे मुक्त छंदातील स्वैर नाट्यरूपांतर प्रसिद्ध झाले होते. 'मेघदूतसार अथवा मनोरंजक कल्पनातरंग'(१९८४) या नावाचे एक गद्य भाषांतरसुद्धा होते.
या वर्षी २३ जूनला आषाढाच्या पहिल्या दिवशी पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात ज्ञानेश पेंढारकर, माधुरी करमरकर आणि मंदार आपटे यांनी मेघदूतावर एक नृत्यनाटिका सादर केली. दोन वर्षांपूर्वी कालिदासदिनी(आषाढस्य प्रथमदिवसे) १५ जुलै २००७ रोजी, ठाण्याच्या गडकरी रंगायतनात कालिदासाच्या मेघदूतातील काही रचनांवर आधारित एक कार्यक्रम झाला होता. किराणा घराण्याच्या वरदा गोडबोले यांनी सादर केलेल्या शास्त्रोक्त संगीताच्या या कार्यक्रमात नीलिमा कढे यांनी प्रासंगिक नृत्ये केली होती.