परीक्षाच नाहीत, मग बोर्ड कशाकरिता हवे? महाराष्ट्रासारख्या विशाल राज्यात आजच्या घडीला मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ ही चार एस्एस्सी बोर्डे आहेत. एका बोर्डाने काम जमेना तेव्हा चार करावी लागली. त्यामुळे, आता संपूर्ण देशासाठी एक बोर्ड करणे कितपत शक्य आहे? एका वरवंट्यासारख्या हुकमाने सेंट्रल स्कूलच्या दहावीच्या परीक्षा रद्द करणे सोपे आहे. मग त्या मुलांना महाराष्ट्रातील कॉलेजांत जागा मिळणार नाहीत त्याचे काय?
शिक्षणक्रम समान करणे हे आपल्या विविधरंगी संस्कृतीच्या देशात शक्य नाही. म्हणजे, मराठी, संस्कृत, शिवाजीचा इतिहास, तुकाराम ज्ञानेश्वर, दादोजी कोंडदेव, रामदासस्वामी यांना शिक्षणक्रमात कोणतेही स्थान असणार नाही. आणि महाराष्ट्रातील मुलांना नागालॅन्ड, मणिपूर, त्रिपुरा येथे झालेल्या युद्धांचा अभ्यास करावा लागेल.