कारण, एककल्ली विचार करणे असा वाक्यप्रयोग प्रचलित आहे. एकतर्फी योग्य होईल असे वाटत नाही.
मीही तुझा, तूही तुझी, हे एककल्ली वाटते
माझ्या हिशेबाने यात दोन तऱ्हेने अर्थ अभिप्रेत असावा.
१. मीही तुझा, तूही तुझी - पण, तू माझी नाहीस. (तुझ्यामुळे) - तू माझा केलेला अस्विकार
२. मीही तुझा, तूही तुझी - पण, तू माझी नाहीस. (माझ्यामुळे) - मी तुझा केलेला अस्विकार
या ओळीच्या वर प्रश्न विचारला आहे
न्यायीपणे वागायची इच्छा तुला होईल का?
या प्रश्नाकडे पाहिले तर 'तू माझा केलेला अस्विकार' असे कवीला सुचवायचे आहे काय?
तराजूला स्थिर राहण्यासाठी दोनही बाजूंनी समान वजन असावे लागते. (अर्थात त्यात गडबड नसेल तर.. ) इथे पारडे एकाच बाजूला कलते आहे असे काहितरी सूचित करायचे आहे असे वाटते. म्हणून मला एककल्ली हा शब्दप्रयोग योग्य वाटला. एकतर्फीपेक्षा एककल्ली हा शब्द चपखल आहे असे माझे मत. बाकी मत अर्थात कवीचेच आहे.