इंटरनेटवर मला मिळालेले एक संकेतस्थळ : hellscream.multiply.com या संकेतस्थळावरील 'ब्लॉग' मधील "मेघदूत बाय कालिदास" या (जर्नल शीर्षकाखालील) यादीत संपूर्ण मेघदूत इंग्रजी अनुवादासह मिळते. श्लोक देण्याची पद्धत मात्र थोडी खटकली. आतापर्यंत वाचलेल्या मेघदूतात चार ओळींमध्ये असणारे श्लोक पाहिले. येथे दोन-दोन ओळींमध्ये श्लोक दिले आहेत. उगाच आर्या वाचत असल्यासारखे वाटत राहिले.
अवांतरः दूवा कसा द्यायचा? श्री. भाष यांनी दि. ३१/५/२००५ च्या त्यांच्या मांडणीमध्ये दिलेली पद्धत वापरताना अडखळल्यासारखे होते. यात काही बदल झाला आहे की मी कुठे चुकतो आहे हे समजत नाही.