जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळा सुरु झाला असून आता भटक्यांचे अर्थात ट्रेकर्स मंडळींचे पावसाळी ट्रेक सुरु झाले असतील. अस्सल ट्रेकर्सना पावसाळा म्हणजे फिरण्यासाठी पर्वणीच असते. मात्र या मंडळींबरोबरच हौशी मंडळीही खास पावसाळी पिकनिकसाठी आतुर असतात. काही सन्मान्य अपवाद वगळता पावसाळी पिकनिक म्हणजे कुठेतरी गड-किल्ल्यावर जाणे, जाता-येताना आणि जिथे मुक्काम करणार असून तेथेही यथेच्छ दारू पिणे, सिगरेट्स ओढणे, ओंगळ नृत्य करणे व गाणी म्हणणे असे समीकरण झाले आहे. शनिवारी रात्री शेवटच्या कर्जत किंवा कसारा ट्रेनला अशा काही ग्रुप्सची झलक हमखास पाहायला मिळते. अर्थात याला अपवादही आहेत ...