जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:

त्या दिवसापर्यन्त मला काहीच दिसत नव्हतं... फक्त माझ्या आईचा, एका भावाचा आणि एका बहिणीचा आवाज ऐकु येत होता... त्या दोघांचे डोळे कदाचित माझ्या आधीच उघडले होते. "आई, हे काय आहे?", "आई मी हे खाऊ का?", "आई ही अजुन डोळे का उघडत नाहिये? " असे प्रश्न विचारुन ते आईला त्रास देत होते. पण आई शांतच असायची. मला आईचा आवाज ऐकायचा असायचा पण ती खुप कमी बोलायची. जेवढा वेळ आमच्याबरोबर असायची त्यातला बराचसा वेळ ती मला चाटण्यात घालवायची.

"आई तू आमच्यापेक्षा त्या पिल्लावरच जास्त प्रेम करतेस. त्याचे डोळेपण उघडले नाही आहेत. ते नीट दुध पीत नाही. ते काही बोलत ...
पुढे वाचा. : म्याव...१