अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
घ्रर्रर्र….
नदीकिनार्याच्या शांत वातावरणाला चिरत तो आवाज आसमंतात भरला. आसपासच्या झाडाझुडपांवरची पाखरं कावरी बावरी होत उडाली. नदीकाठाने मॉर्निंग वॉकला जाणार्यांचे चेहरे त्रासिक बनले. नेहमीच्या चिवचिवाटाची जागा यांत्रिक थडथडाटाने घेतली. मातीचा धुरळा उडून धुकं धुकं झालं. भले मोठे जेसीबी नदीकाठच्या उंचसखल जमिनीला एकसारखे करण्याच्या कामाला जुंपले. नदीच्या ओंजळभर पाण्यातही तगून राहिलेले मासे भेदरून तळातल्या कपारींच्या आश्रयाला गेले. पाण्यावर धुळीचं बारिकसा तांबडा-पांढरा थर साचू लागला. सावळ्या चेहर्याच्या बाईनं तोंडभर पावडर थापून ...
पुढे वाचा. : गर्वहरण