काही मिनिटे मुरत ठेवायचा म्हणजे किती मिनिटे?
जीभ पोळणार नाही इतके तापमान कमी होते तेव्हापासून घश्याला शेक मिळतो आहे इतपत तापमान असेपर्यंत केव्हाही चहा गाळून घ्यायला हरकत नाही. हा कालावधी पाच ते दहा मिनिटे इतका येतो असा आमचा अनुभव आहे.
झाकण ठेवायचे का नाही?
झाकण ठेवायचे.
दूध घातलेला चहा मुरत ठेवायचा का कोरा?
दूध तापवण्यासाठी वेगळे भांडे शक्य असेल तर कोरा चहा मुरत ठेवावा. दूध तापवण्यासाठी वेगळे भांडे शक्य नसेल तर (नाइलाजाने) दूध घातलेला चहा मुरत ठेवावा.
गार झाला तर पुन्हा गरम करायचा?
गार होऊ न देणे हेच उत्तम. दुसऱ्या उकळीच्या चहाला पहिल्या उकळीची सर येत नाही असे वाटते.
त्या पेक्षा टपरी वर जाऊन प्यावा हेच खरे.
हो. तसे करायला हरकत नाही. पण टपरीवर गेल्यास इतर आकर्षणांमुळे चहावरचे लक्ष विचलित होण्याचा धोका आहे.
पक्षीनिरीक्षण, धूम्रपान, वर्तमानपत्रवाचन, दूरचित्रवाणीप्रेक्षण अश्या कार्यांमध्ये चहापानाचा केवळ साथसंगत म्हणून वापर करणे हा चहाचा अपमान आहे.
परंतु आवडते संगीत, कोसळणारा पाऊस, गुलाबी थंडी, प्रिय व्यक्तीची अथवा व्यक्तींची उपस्थिती इत्यादी पार्श्वभूमीवर चहापान अधिक रंगू शकते असे वाटते.
चू भू द्या घ्या
आपला
(चहाभक्त) प्रवासी