जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
वर्षा ऋतूमध्ये अर्थात आपल्या पावसाळ्यात निसर्गाचे रुप अत्यंत मनोहारी आणि मंत्रमुग्ध करणारे असते. निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करून विविध झाडे, झुडपे, फुले यांचा खजिनाच आपल्यासमोर उधळलेला असतो. पावसाळ्यातील निसर्गाची ही उधळण पाहून मन वेडे होऊन जाते. पावसाळ्यात भटकंती करणाऱे ट्रेकर्स आणि पिकनिक करणाऱया मंडळींसाठी निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. या भ्रमंतीमध्ये विविध रंगांची, आकारांची अनेक फुले, झाडे पाहायला मिळतात. ही लहान-लहान फुलझाडे अत्यंत सुंदर ...
पुढे वाचा. : खजिना रानफुलांचा