शब्दांचा कीस पाडण्यांत बुद्धी व वेळ खर्च होऊ नये म्हणून चर्चाप्रस्तावात उल्लेखलेल्या प्रसंगाच्या आधारेच स्पष्टीकरण देतो :
रशियाच्या मुजोरीवर अमेरिकेने सर्वनाशाच्या भीतीने गप्प राहणे, इतर राष्ट्रांना साकडे घालून रशियाची अजीजी करणे (ज्याचा रशियावर मुळीच परिणाम झाला नसता) पसंत केले असते तर ते (माझ्या मते) नपुसकत्व ठरले असते. अमेरिकेने सर्वनाशाच्या प्रच्छन्न धमकीला घाबरत नसल्याचे दाखवून दिल्यावर रशियाने माघार घेतली. कारण त्यालाही सर्वनाशाची भीती होतीच.