हो. तसे करायला हरकत नाही. पण टपरीवर गेल्यास इतर आकर्षणांमुळे चहावरचे लक्ष विचलित होण्याचा धोका आहे. पक्षीनिरीक्षण, धूम्रपान, वर्तमानपत्रवाचन, दूरचित्रवाणीप्रेक्षण अश्या कार्यांमध्ये चहापानाचा केवळ साथसंगत म्हणून वापर करणे हा चहाचा अपमान आहे.

पण टपरीवरचा गुरुमहाराज ज्या भक्तीभावाने आणी तन्मयतेने चहा करतो त्याची सर पंचतारांकीत हॉटेल मधल्या चहाला पण येणार नाही. टपरीवाला तयार चहा मसाला वापरत नाही. पितळी खलबत्यात कायकाय घालून कुटत असतो ते त्यालाच ठाऊक! चहा तयार झाला की पोऱ्या तत्परतेने चहाचा ग्लास आणून देतो (टीपची अपेक्षा न करता) असा तो चहाचा प्याला ओठाला लावल्यावर "स्वर्ग म्हणतात तो हाच" असा अनुभव येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

पक्षीनिरीक्षण, धूम्रपान या गोष्टी वय, स्थळ, काळ आणी ज्याच्या त्याच्या आवडी निवडी वर अवलंबून असतात. सुंदर पक्षी टपरीच्या आसपास अपवादानेच आढळून येतात असा माझा (जुना) अनुभव आहे. असे पक्षी तथाकथीत "ऊच्चभ्रु" हॉटेलातला पाचकळ चहा थव्याने प्यायला जातात. अश्या पेयाला चहा म्हणण हाच जातीवंत चहाचा केवढा अपमान!

परंतु आवडते संगीत, कोसळणारा पाऊस, गुलाबी थंडी, प्रिय व्यक्तीची अथवा व्यक्तींची उपस्थिती इत्यादी पार्श्वभूमीवर चहापान अधिक रंगू शकते असे वाटते.

ज्याच्या त्याच्या आवडी निवडी!