कुणीही बोलले नाही कसे काही?
कुणीही ऐकले नाही जसे काही!

उद्या काढील कोणी माग डोळ्यांनी...
इथे तू सोड स्वप्नांचे ठसे काही!


व्वा... फारच छान गझल. अभिनंदन आणि आभार.


तशी वाया न गेली भेट दोघांची...
जरी हाती न आले फारसे काही!

हा शेर तर पुनःपुन्हा वाचावासा वाटणारा.... सुरेख...