जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
वांद्रे-वरळी सागरी सेतुचे उदघाटन नुकतेच झाले आणि आता या सेतुच्या नामकरणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सेतुला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, असा सूचनावजा आदेश दिला आणि मम म्हणत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. पुलाच्या घाईगर्दीत झालेल्या या नामकरणास शिवसेना-भाजपने विरोध केला असून या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राजीव गांधी यांच्यापेक्षा वेगळे नाव ...