पातेल्यात चहासाठी पाणी घालून गॅसवर ठेवावे. त्यात पाण्याच्या दिडपट चमचे साखर घालून साखर पुर्णपणे विरघळण्याकरता ढवळावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
पाण्याला उकळी आली की त्यात पाण्याच्या दुप्पट चमचे चहा पावडर टाकावी. १ मिनिट उकळून गॅस बंद करावा. नंतर त्यावर झाकण ठेवावे, १ मिनिटाने झाकण काढावे. उकळलेल्या चहाची पावडर तळाला गेली पाहिजे तोपर्यंत झाकण ठेवावे.
नंतर दुसऱ्या पातेल्यात अंदाजाने त्या चहाला पुरेल असे दुध वेगळे गरम करावे आणि मग त्यात चहा गाळावा. दुधाचे प्रमाण असे पाहिजे की खूप लालभडक पण होता कामा नये आणि दुधाळ पण.
चहात आले टाकायचे असेल तर चहाच्या पाण्याबरोबरच आले ठेचुन टाकावे म्हणजे चांगली चव येते. आल्याचा छोटा तुकडा चिमट्यात (की ज्याने आपण चहाचे भांडे धरतो) धरुन तो दाबावा व लगेचच चहाच्या पाण्यात टाकावा म्हणजे सगळा रस चहात उतरतो.
चहा कसा नसावा
दुधाळ आणि लालभडक
अगोड आणि खूप गोड
कडवट आणि पांचट
रोहिणी