मनोगतावरील एक लेखक श्री मिलिंद जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी मनोगतावर 'तेलही गेलं' नावाचा एक माहितीपूर्ण लेख लिहिला होता. लोकप्रभा या मराठी साप्ताहिकानं त्यांच्या मागील आठवड्याच्या अंकात हा लेख कव्हर स्टोरी म्हणून प्रकाशित केला आहे. एखादा लेख अशा प्रकारे प्रसिद्ध होणं प्रशंसनीय आहेच, पण कव्हर स्टोरी म्हणून येणं जास्त उल्लेखनीय आहे, कारण त्यावरून त्या लेखनाचं मूल्य वरच्या प्रतीचं आहे हे लक्षात येतं.
मिलिंद यांचं त्यासाठी अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
लोकप्रभाच्या संकेत स्थळावर दुवा क्र. १ या ठिकाणी आपल्याला हा लेख बघता येईल.